breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

जोगेश्वरी स्थानकातील सहा गाडय़ांचे थांबे रद्द

स्टेशन मास्तर कार्यालयाकडे प्रवाशांची नाराजी

पश्चिम रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू करताना जोगेश्वरी स्थानकात चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सहा जलद गाडय़ांचे थांबे रद्द करण्यात आले आहेत.

सकाळच्या गर्दीच्या वेळेतील या गाडय़ांचा समावेश असल्याने जोगेश्वरीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत. गुरुवारी प्रवाशांनी जोगेश्वरी स्थानकातील स्टेशन मास्तरांकडे याविषयी संताप व्यक्त केला व प्रवाशांनी तक्रार नोंदवली. या वेळी खबरदारी म्हणून स्थानकात रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पश्चिम रेल्वेवर १ नोव्हेंबरपासून लोकल गाडय़ांचे नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले. गर्दीच्या वेळी आणखी लोकल फेऱ्यांची भर, २६ लोकल गाडय़ांच्या वेळा बदलतानाच यातील काही गाडय़ा जलद करण्यात आल्या आहेत. असे अनेक प्रकारचे बदल पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले.

यात जोगेश्वरी स्थानकात चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या सहा जलद लोकल गाडय़ांना दिले जाणारे थांबेच रद्द केले. प्रवाशांची गैरसोय होणार असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.

गुरुवारी स्थानकात आलेल्या प्रवाशांची यामुळे गैरसोयच झाली. फलाट क्रमांक चारवर येताच गोरेगाव, मालाड जलद लोकल रद्द झाल्याने काही प्रवाशांनी स्टेशन मास्तरकडे येऊन नाराजी व्यक्त केली. या वेळी स्टेशन मास्तर कार्यालयात तक्रार नोंदविण्यात आली. जोगेश्वरीतील काही स्थानिकांनी याविरोधात रेल रोको करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे या स्थानकात पोलिसांचा मोठा फौजफाटा होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button