breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

जोगेश्वरीमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला

विनाहेल्मेट तरुणावर कारवाईदरम्यान वाद

जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी दुपारी विनाहेल्मेट मोटारसायकल चालविल्याबद्दल कारवाईसाठी थांबलेल्या तरुणाने पोलिसांशी वाद घातला. पोलिसांकडून आपणास मारहाण झाल्याच्या त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवत जमावाने हवालदारावर हल्ला चढवला. यावेळी मध्ये पडलेल्या पोलीस निरीक्षकालाही जमावाने मारहाण केली. अंबोली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलीस उपायुक्त परमजीत दहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबोली पोलिसांकडून जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळ वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाई सुरू होती. पोलीस शिपाई सागर कोंडविलकर याने विनाहेल्मेट मोटरसायकल चालवणाऱ्या एन. खरोडिया या तरुणाला थांबवले. त्याने दंड भरण्याऐवजी पोलिसांसोबत हुज्जत घातली. तेथून पळून जाण्याचा प्रयत्नात त्याने सागरच्या हातावर फटका मारला. सागरच्या हातातून रक्त येऊ  लागले. सागर आणि इतर पोलिसांनी पाठलाग करून तरुणाला पकडण्याचा प्रयत्न केला.

तेव्हा हाताचे रक्त खरोडियाच्या शर्टला लागले. ही संधी साधून त्याने पोलिसांनी मारहाण केल्याचा बनाव रचला. आरडाओरड केली. गोळा झालेल्या गर्दीने त्यावर विश्वास ठेवला आणि सागरवर हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी मधे पडलेले पोलीस निरीक्षक सरगर यांच्या हाताच्या बोटालाही इजा झाली.

याप्रकरणी सरकारी कामात अडथळा, अधिकाऱ्याला मारहाण आणि दंगल या कलमांनुसार गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे दहिया यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button