breaking-newsराष्ट्रिय

जॉब मिळत नसल्याने आयआयटी हैदराबादमधील विद्यार्थ्याची आत्महत्या

रोजगाराच प्रश्न देशात गंभीर रुप धारण करीत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे आयआयटी हैदराबादमधील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी या विद्यार्थ्याने ८ पानांची एक मोठी सुसाईड नोट लिहीली असून यामधून त्याने आपल्या अपेक्षा आणि त्याचा झालेला भंग याबाबत विवेचन केले आहे. तसेच त्याने आपल्या मित्रांनाही सल्लाही दिला आहे. जीवन एकदाच मिळते ते चांगल्या प्रकारे जगा असे त्याने म्हटले आहे.

मास्टर्स डिग्रीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या या विद्यार्थ्याने आयआयटी हैदराबादमधील वसतिगृहातील आपल्या खोलीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्याने या कृत्यासाठी आपल्या पालकांची माफीही मागितली आहे. यामध्ये त्याने पालकांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टांना न्याय देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. त्याला परिक्षेत कमी मार्क मिळाल्याने चांगला जॉब मिळत नव्हता, अशी माहितीही समोर येत आहे.

सुसाईड नोटमध्ये लिहिताना त्याने म्हटले की, मी इतरांप्रमाणेच स्वप्नं पाहिली होती. मात्र, आता ही स्वप्नचं पूर्णपणे रिकामी झाली आहेत. मी उगाचच लोकांसमोर सकारात्मकता दाखवत होते, चेहऱ्यावर हसू दाखवत होते, मी ठीक असल्याचे लोकांना सांगत होतो तसेच माझं नैराश्य कधीही कोणाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला नाही. माझ्याप्रमाणे अशी अनेक जणांची अवस्था आहे, अशा शब्दांत त्याने आपली आगतीकता व्यक्त केली आहे.

हैदराबादमध्ये गेल्या काही वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी विविध कारणांसाठी आत्महत्या केल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी हैदराबादसह तेलंगाणातील काही भागांमध्ये सुमारे ५० विद्यार्थ्यांनी परिक्षेत नापास झाल्याने आत्महत्या केल्या होत्या. त्याचबरोबर काही घटना अशाही घडल्या होत्या ज्यामध्ये जेईईच्या मुख्य परिक्षेत नापास झाल्याने त्यामुळे आयआयटीमध्ये सुरक्षित जागा न मिळू शकल्याने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button