breaking-news

जेट एअरवेज विस्तार करणार

मुंबई – जेट एअरवेज कंपनीने भारतातील सेवेची 25 वर्षे पूर्ण केली असून कंपनी आगामी काळात विस्तारीकरण करणार असल्याचे कंपनीचे अध्यक्ष नरेश गोयल यानी सांगितले. भारतीय विमान वाहतुकीचा चेहरामोहरा बदलण्याचे श्रेय असलेल्या जेट एअरवेजचे पहिले विमान 5 मे 1993 रोजी मुंबईहून अहमदाबादच्या दिशेने उडाले व कंपनीने भारताला जगाशी जोडण्याचा प्रवास सुरू केला, असे ते म्हणाले. 1993 च्या सुरुवातीच्या काळात केवळ 4 एअरक्राफ्टच्या ताफ्याने 6 ठिकाणी सेवा देण्यापासून आज 119 एअरक्राफ्टच्या ताफ्याने व पार्टनर एअरलाइन्सच्या मदतीने जगभरातील अंदाजे 450 ठिकाणी सेवा देणाऱ्या जेट एअरवेजने भारतभरातील व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना व फ्रेट व्यवसायाला सेवा देत, तसेच भारतात व जगात व्यापार व पर्यटनाच्या वाढीला मोठी चालना देत, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.

उत्पादने व सेवा यासाठी लक्षणीय गुंतवणूक करून जेट एअरवेजने आपल्या फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले आहे. सेवा देण्याबद्दलच्या कंपनीच्या विशिष्ट विचारांमुळेही हा जागतिक स्तरावर स्वतःचे नाव निर्माण करणारा, विमान प्रवासात प्रवाशांना सर्वोत्तम हॉस्पिटॅलिटी देणारा भारतातील विशेष ब्रॅंड ठरला आहे. त्यांना अशीच सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत व यापुढेही भारताला जगाशी जोडणार आहोत. आगामी काळात हे क्षेत्र वेगाने वाढणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button