breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

जेट एअरवेज कर्मचा-यांच्या प्रतिनिधी मंडळाने मुख्यमंत्र्याची घेतली भेट

नवी दिल्ली – भारताची सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी असलेली जेट एअरवेज सध्या मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करत आहे. याच पार्श्वभूमीवर आज (१० मे) जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने असे म्हटले आहे कि, आपण कमी पगारात काम करण्यास देखील तयार आहेत.

माध्यमांशी बोलताना एका कर्मचाऱ्याने म्हटले कि, आम्ही कमी पगारात काम करण्यास देखील तयार आहोत. मात्र जेट एरवेज पुन्हा सुरु व्हावी अशी आमची इच्छा आहे. सरकार लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर या प्रकरणात हस्तक्षेप करेल असे आश्वासन आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button