breaking-newsराष्ट्रिय

जेएनयूत इस्लामिक दहशतवाद अभ्यासक्रम ; आयोगाकडून नोटीस

नवी दिल्ली : दिल्ली अल्पसंख्याक आयोगाने मंगळवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या रजिस्ट्रारला नोटीस बजावली आहे. ‘इस्लामिक दहशतवाद’ विषयक एक अभ्यासक्रम सुरू करण्याच्या विद्यापीठाच्या प्रस्तावामागचे कारण जाणून घेण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले आहे. कोणत्या आधारावर इस्लामिक दहशतवादावर अभ्यासक्रम सुरू केला जातोय याचे स्पष्टीकरण देण्याची सूचना विद्यापीठाला करण्यात आल्याची माहिती आयोगाचे प्रमुख जफरुल इस्लाम खान यांनी दिली.

जेएनयू अकॅडमिक परिषदेने ‘सेंटर फॉर नॅशनल सिक्युरिटी स्टडीज’ची स्थापना करण्याचा प्रस्ताव संमत केला आहे, यांतर्गत ‘इस्लामिक स्टेट’वर आधारित अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. मागील आठवडय़ातील बैठकीत सहभागी झालेल्या एका प्राध्यापकाने याची माहिती दिली.

प्रस्तावित केंदात इस्लामिक दहशतवादावर अभ्यासक्रम सामील करण्यासाठी कोणताही प्रस्ताव आहे का, अशी विचारणा आयोगाने जेएनयू प्रशासनाला केली. त्याचबरोबर प्रस्तावाची एक प्रत देखील मागविण्यात आली. प्रस्तावित अभ्यासक्रमाला जेएनयूच्या विद्यार्थी आणि शिक्षकांच्या एका गटाने विरोध केला आहे. इस्लामिक दहशतवादावरील अभ्यासक्रम सुरू करण्याचे पाऊल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया जेएनयू विद्यार्थी संघाचे अध्यक्षा गीता कुमारी हिने व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button