breaking-newsTOP Newsपुणे

जुन्नरमध्ये राष्ट्रवादीला दुःखद धक्का, कोरोनामुळे माजी नगराध्यक्षाचे निधन

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सामाजिक कार्य करताना पुण्यात अनेक लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे (वय 58) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आज पहाटे उपचारादरम्यान त्यांची  प्राणज्योत मालवली.

जुन्नर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दिनेश दुबे यांचा कोरोनामुळे  पहाटे पुणे येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. काही दिवसांपूर्वी दिनेश दुबे यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते.

माजी आमदार वल्लभ बेनके, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते विश्वासू सहकारी होते. जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी दिनेश दुबे यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक लढवय्या नेता कोरोनाच्या लढाईत अपयशी झाल्याची हळहळ जुन्नरमध्ये व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button