breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जाधववाडीत 11 कोटींची विकासकामे; मात्र, अधिका-यांना एकाही कामाची माहिती नाही

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाने माजी महापौर राहूल जाधव यांच्या जाधववाडी प्रभागामध्ये तब्बल 11 कोटी 65 लाख रुपयांची विकासकामे काढली आहेत. मात्र, ही कामे कोणती आहेत, याबाबतचे स्पष्टीकरण विभागप्रमुखांना देता न आल्याने स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी या विभागावर ताशेरे ओढले आहेत. तब्बल 11 कोटींचा खर्च आणि एकाही कामाची माहिती नाही, असे म्हणत त्यांनी हा विषय तहकूब ठेवला.

महापालिकेच्या स्थापत्य विभागाने जाधववाडी येथील गट क्रमांक 539 विकसीत करणेकामी मे. एच. सी. कटारिया यांच्याकडून 11 कोटी 65 लाख 20 हजार 657 या एकूण खर्चातून मटेरियल टेस्टींग शूल्क वगळून एकूण 11 कोटी 48 लाख 35 हजार 305 एवढ्या रक्कमेची निविदी मागविली. हे काम कटारिया यांच्याकडून निविदा दराच्या 5.15 टक्के कमी दराने करवून घेण्यात येणार आहे. त्यामध्ये 2018-19 चे एसएसआर दर समाविष्ठ करत निविदेचा दर 5.53 टक्के कमी येत आहे. प्राप्त निविदा दर 10 कोटी 89 लाख 21 हजार 287, रॉयल्टी चार्जेस 9 लाख 84 हजार 502 आणि मटेरियल टेस्टिंग चार्चेस 7 लाख 850 अशी एकूण रक्कम 11 कोटी 6 लाख 6 हजार 639 एवढ्या खर्चाला मंजुरी घेण्यासाठीचा प्रस्ताव बुधवारी (दि. 29) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवला.

मात्र, जाधववाडी गट नं. 539 मध्ये कोणती विकास कामे केली जाणार आहेत. याबाबत सभापती विलास मडिगेरी यांनी विचारले असता स्थापत्य विभागातील अधिका-यांना त्यावर स्पष्टीकरण देता आले नाही. यात कोणती कामे करण्यात येणार आहेत, हेच जर तुम्हाला माहित नसेल, तर तुम्हा येवठ्या मोठ्या खर्चाच्या मंजुरीचे विषय कशासाठी समोर आणता ?, अशा शब्दांत मडिगेरी यांनी स्थापत्य विभागाचे वाभाडे काढले. विकास कामांची माहिती सादर होईपर्यंत हा विषय तहकूब ठेवण्यात आला आहे. ही विकासकामे माजी महापौर राहूल जाधव यांच्या प्रभागात होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button