breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जाता-जाता स्थायीने मारला 400 कोटींचा ‘मास्टर स्ट्रोक’

  • सभापती ममता गायकवाड यांची शेवटची सभा संपन्न
  • देखभाल दुरूस्ती, पाणी पुरवठा या भरगच्च कामांचा समावेश 

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामांना स्थायी समितीच्या बैठकीत गुरूवारी (दि. 28) मान्यता देण्यात आली. विद्यमान सभापती ममता गायकवाड यांची ही शेवटची स्थायी समिती सभा राहिल्याने त्यांनी सुमारे ४०० कोटींच्या खर्चाला मान्यता दिली.

स्थायी समिती सभागृहात आज झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. चिंचवड उपविभागाअंतर्गत देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी सुमारे १८ लाख ४६ हजार रुपये, नवीन प्रभाग क्र.२७ रहाटणी येथील मनपा शाळेच्या नुतणीकरणासाठी सुमारे ३३ लाख ३४ हजार रुपये, प्रभाग २६ कस्पटे वस्ती स्मशानभूमी येथे गॅंबियन वॉल बांधणे व इतर स्थापत्य विषयक आनुषंगिक कामे करण्यासाठी सुमारे २ कोटी १८ लाख, सेक्टर २९ येथील टाकीवरुन पाणीपुरवठा होणार्‍या वितरण व्यवस्थेचे परिचालन करणे व देखभाल दुरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे ३५ लाख ९२ हजार रुपये आदी विषयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.

दापोडी जलक्षेत्राचे परीचालन करणे व देखभाल दुरूस्ती करणेकामी सुमारे ३२ लाख ६१ हजार रुपये, प्रेमलोक पार्क उपविभागासाठी सुमारे २४ लाख ४४ हजार रुपये, स.न. ९६ रावेत गायरण, मामुर्डी उपविभाग अंतर्गत देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी सुमारे ४४ लाख ४८ हजार रुपये, थेरगाव येथील जलक्षेत्राचे परीचालन करणे व देखभाल दुरूस्ती करणेकामी येणा-या सुमारे ६५ लाख ४३ हजार रुपये, ताथवडे, पुनावळे, काळा खडक येथीलही याच कामासाठी सुमारे ५५ लाख ५९ हजार रुपये, एल्पो पाण्याची टाकी व परिसरातील तत्सम कामासाठी सुमारे ३८ लाख ७१ हजार रुपये, अशोक थिएटर व नव महाराष्ट्र विद्यालय, पिंपरी येथील याच कामासाठी सुमारे ६६ लाख १२ हजार रुपये, पिंपळे सौदागर मधील सुध्दा याच कामासाठी सुमारे ५९ लाख ९८ हजार रुपये, लक्ष्मणनगर गणेशनगर, थेरगांव येथील तत्सम कामासाठी सुमारे ५२ लाख ६५ हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. सांगवी येथील या कमासाठी सुमारे ५९ लाख २६ हजार रुपये, श्रीनगर येथील याच कामासाठी सुमारे ४९ लाख ५२ हजार रुपये, विजयनगर- काळेवाडी भागातील याच कामासाठी सुमारे ४४ लाख १८ हजार रुपये, भगवाननगर, वाकड येथील या कामासठी सुमारे ४८ लाख २८ हजार रुपये, पिंपळेगुरव येथील या कामासाठी सुमारे ५४ लाख ७४ हजार रुपये, बिजलीनगर, चिंचवड येथील या कामासाठी सुमारे ४१ लाख ३२ हजार रुपये आदी विषयांना मान्यता दिली आहे.

क्षेत्रीय कार्यालय कंत्राटी कामगारांचे वाढीव खर्चापोटी येणा-या सुमारे ५७ लाख ९७ हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इ प्रभागातील जलनि:सारण नलिकांची साफसफाई व देखभाल करणेकामी सुमारे १ कोटी २६ लाख, क क्षेत्रीय कार्यालय कंत्राटी कामगारांचे वाढीव खर्चापोटी सुमारे १ कोटी ८३ लाख, इ क्षेत्रीय कार्यालय कंत्राटी कामगारांचे वाढीव खर्चापोटी सुमारे २ कोटी ५० लाख आदी विषयांना मंजुरी देण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button