breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरवूनही ; भाजप नगरसेवकांवर कारवाईस आयुक्तांची टाळाटाळ

पिंपरी – महापालिका निवडणुकीत चिखली प्रभाग क्रमांक एक मधून अनुसूचित जाती प्रवर्गातून भाजपच्या तिकिटावर कुंदन गायकवाड निवडून आले.  त्या नगरसेवकाचा जातपडताळणी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज बुलढाणा जातपडताळणी समितीने अवैध ठरविला आहे. त्यावर महापालिकेने तातडीने कारवाई करणे गरजेचे होते. परंतू, सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे महापालिका  आयुक्त श्रावण हर्डीकर हे वेळकाढूपणा करीत आहे, असा आरोप शिवसेनेच्या संघटिका सुलभा उबाळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला आहे. यावेळी शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर, अभिमन्यू लांडगे, नितीन रोकडे, अॅड. सुनील माने, अॅड. एस. जे. वाळके आदी उपस्थित होते.

महापालिका निवडणुकीत चिखली (प्रभाग क्रमांक 1) येथून अनुसूचित जाती या राखीव प्रवगातून कुंदन गायकवाड हे भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेतर्फे नितीन रोकडे यांनी निवडणूक लढविली होती. कुंदन गायकवाड यांनी खोटा जातीचा दाखला सादर केल्याप्रकरणी नितीन रोकडे यांनी बुलढाणा उपविभागिय अधिका-यांकडे दावा दाखल केला होता. मात्र, तो फेटाळण्यात आला. निवडणूक निकालापासून सहा महिन्याच्या जातपडताळणी प्रमाणपत्र दाखला सादर करणे बंधनकारक असल्याने गायकवाड यांनी बुलढाणा येथे जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केला. मात्र, हा अर्ज जातपडताळणी समितीने ऑगस्ट 2017 मध्ये अवैध ठरविला.

तसेच पिंपरी महापालिका प्रशासनालाही त्यांनी इ-मेलद्वारे कळविले होते. त्यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करणे गरजेचे असताना दुर्लक्ष केले. त्यामुळे नगरसेवक गायकवाड यांना उच्च न्यायालयातून जातपडताळणी समितीच्या आदेशाला स्थगिती आणण्याची संधी मिळाली. त्यानंतरही वेळोवेळी झालेल्या सुनावणीला महापालिका प्रशासन वेगवेगळी कारणे देऊन विलंब करत आहे. केवळ कुंदन गायकवाड हे भाजपचे नगरसेवक असल्याने महापालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, असा आरोप योगेश बाबर यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button