breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जागतिक दिव्यांग दिनाच्या औचित्याने “दिव्यांग सक्षमता अभियानाचा” शुभारंभ

पिंपरी / महाईन्यूज

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून राज्यातील दिव्यांगांना स्वयंरोजगारातून आत्मसन्मान मिळवून देण्याच्या उदात्त हेतूने “उद्योजक संसद” व “श्री आयुर क्लिनिक” यांच्या संयुक्त विद्यमाने “दिव्यांग सक्षमता अभियान” सुरु केले आहे, अशी माहिती नॉव्हेल ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटचे संस्थापक अमित गोरखे यांनी दिली.

देशातील लोकसंख्येच्या साधारणपणे २.१ % दिव्यांगाचे प्रमाण असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढल्याने दिव्यांगांना उपलब्ध संधींमध्ये प्रचंड घट आली आहे. या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी विविध व्यवसायाच्या विविध संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत, अशी माहिती विश्वास उद्योजक संसदचे अध्यक्ष अक्षय सरोदे यांनी दिली.

यातील पहिली व्यवसाय संधी ही, “शतप्लस” या अत्यंत प्रभावी रोग प्रतिकार शक्ती वर्धक, आयुर्वेदिक, हर्बल व नॅनो तंत्रज्ञानाधारित औषधाच्या विक्री व वितरणाची सुरुवात वरील संस्थांच्या सहभागाने होत आहे. हे औषध anti -viral, anti -inflammatory व anti-oxident असल्याने अनेक आजारांपासून दूर ठेवते. आपल्या देशातील पारंपारिक ज्ञानाने समृद्ध असलेल्या तज्ज्ञांच्या सल्ल्याने देशी वनस्पतींपासून (Herbal) निर्मित व Nano तंत्रज्ञानाधारित हे एकमेव औषध आहे, की जे रोज सकाळीं 5ml व झोपण्याच्या आधी 5ml घेतले असता, आपली रोग प्रतिकार शक्ती आश्चर्यकारक रित्या वाढवते व आपल्याला कुठल्याही प्रकारच्या व्हायरल आजारांपासून दूर ठेवते. शरीराच्या अंतर्गत भागात आलेली सूज देखील या औषध सेवनाने दूर होते. तसेच, या औषधाने आपली कार्यशक्ती वाढते व उत्साह शतगुणीत होतो.

भारत सरकारच्या ICMR या सर्वोच्च संस्थेच्याच्या देखरेखीखाली पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये याची यशस्वी चाचणी झाली असून एकूण रुग्णांपैकी 76% रुग्ण 4 दिवसात, 23% रुग्ण 7 दिवसात व 1% रुग्ण 10 दिवसात बरे झालेले आहेत. कोरोना होऊन बरे झालेल्या पेशंटला अशक्तपणा व अंगदुखी सारख्या विकारांचा प्रादुर्भाव होतो, जे शतप्लस या औषधाच्या सेवनाने 4 दिवसात निराकरण होते, असे प्रयोगांती आढळून आलेले आहे. समाजातील दिव्यांग वर्गाला आर्थिक दृष्टया सक्षम व संपन्न करून त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा विश्वास अमित गोरखे व अक्षय सरोदे यांनी व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button