breaking-newsमहाराष्ट्र

जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांना कोरोनाची लागण

जळगाव – कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून तर सेलिब्रेटी, राजकीय नेतेही आता कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज पाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असताना काल एकाच दिवसात तब्बल 870 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील दोन आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचे आज समोर आले आहे.

पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आमदार किशोर पाटील आणि मंगेश चव्हाण यांना कोरोनाचे लक्षणे दिसून आल्यानंतर चाचणी केली असता, त्यांचा अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते विलगीकरणात गेले आहे. संपर्कात असलेल्यांनी सुद्धा आपली कोरोनाची तपासणी करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button