breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जळगावनंतर रत्नागिरी आगारातही एसटी वाहकाची आत्महत्या

रत्नागिरी – गेल्या तीन महिन्यांपासून वेतन थकल्यामुळे जळगावमध्ये एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता रत्नागिरीतही एसटीच्या वाहकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पांडुरंग संभाजीराव गडवे असं या बस वाहकाचे नाव असून त्यांनी रत्नागिरीच्या एसटी आगारातच गळफास लावून आत्महत्या केली.

पांडुरंग गडवे हे रत्नागिरी एसटी बस आगारात सेवेत होते. 8 नोव्हेंबर रोजी नांदेड ते रत्नागिरी अशी नियोजित कामगिरी करून आले होते. आगारात आल्यानंतर व्यवस्थापकांकडे त्यांनी संपूर्ण हिशेब दिला. त्यानंतर ते आगारातील चालकांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांचे रूमचे पार्टनर पी.ए.तांदळे हे गडवे यांना उठवण्यासाठी गेले होते. रूमचा दरवाजा वाजवल्यानंतरही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांना संशय बळावला. त्यामुळे तांदळे यांनी दार तोडून आत प्रवेश केला असता त्यांना मोठा धक्का बसला.

पांडुरंग गडदे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर तातडीने तांदळे यांनी या घटनेची माहिती आगार नियंत्रक रमेश केळकर यांना माहिती दिली. पांडुरंग गडदे यांच्या आत्महत्येमुळे आगारात एकच खळबळ उडाली.

आगार नियंत्रक रमेश केळकर यांनी या घटनेची माहिती तातडीने रत्नागिरी पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एसटी आगाराकडे धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पांडुरंग गडदे यांचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. गडवे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही.

पांडुरंग गडदे हे अनेक वर्षांपासून रत्नागिरी एसटी बस आगारात काम करत होते. त्यांनी अचानक असे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button