breaking-newsलेख

…जर… तर…पण…शिवसेना आज देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष असता ?

सुजित ठमके | विशेष | लोकशाही शासन व्यवस्थे मध्ये तत्सम विरोधी पक्ष अतिशय मजबुतीने असणे गरजेचे आहे हे दस्तूरखुद,जगातील मोजक्या प्रभावशाली राजकीय वैक्तीमत्वापैकी एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वताचे म्हणणे आहे. केंद्रातील काही अपवादात्मक कालावधी वगळता उदा. तिसरी आघाडी, स्वर्गीय पंतप्रधान अटल विहारी वाजपेयी इत्यादी चा कार्यकाळ तर अधिक कालावधी केंद्रातील सत्ता कॉंग्रेस चीच राहिली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सेनेचा उदय वर्ष १९९० नंतर “ हटाव लुंगी बजाव पुंज्गी” या प्रादेशिक अस्मितेतून झाला असला तरीही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्माई नेतृत्व सेनेला देशातील मोठा राजकीय पक्ष करण्यात पुरेसे होते.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कडे प्रभावी वक्तृत्व, संगठ्नात्मक कौशल्य, हिंदी, मराठी, इंग्रजी इत्यादी भाषेवर असेलेले प्रभुत्व, बड्या बड्या धेंडाना वाकविण्याचे कसब, ९० टक्के समाजकारण 10 टक्केच राजकारण हे प्रभावी शस्त्र सेनेला राष्ट्रीय पक्ष म्हणून पोहचविण्यात पुरेसे होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे लाथ मारीन तिथे पाणी हा चमत्कारिक गुण असल्यमुळे सेना साऊथ चा भाग सोडला तर देश पातळीवर राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आला असतां. १९९० च्या नंतर काळात जरी तिसरा पर्याय म्हणून जनता दलाची लाट आली असली तरी त्यांच्याकडे एकसूत्रता, एकवाक्यता, एक संघ नेतृत्व न्हव्ते. त्यामुळे जनता दलाचा पुढे चिंधी बाजार झाला. पण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतील तसे न्हवते त्यांच्याकडे करिष्माई नेतृत्व होते. त्यामुळे संगठन उभे करण्यास जो पैसा लागतो तो सहज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभा केला असता.

परंतु स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सेनेचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करून मोठा पक्ष उभा करावा या बाबद गंभीर नसावे याची दाट राजकीय शक्यता आहे.कारण सेनेची पाळेमुळे महाराष्ट्रात गाव खेड्यात कशी घट्ट बांधता येईल, कार्यकर्त्यांची विन कशी पक्की करून सामान्यना न्याय कसा मिळेल याबाबद बाळासाहेब अधिक गंभीर संवेदनशील होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी सेनेची शाखा कशी उभी करता येईल यावरच फोकस होता. आज चित्र तसे आहेही.

त्यामुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कडे प्रचंड अद्भुत क्षमता आणी कसब असताना सुद्धा शिवसेना बिहार, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब इत्यादी बड्या राज्यात गाव तिथे सेना स्थापन करता आली नाही. त्याला साऊथ अपवाद होता. हे जरी जर तर चे राजकीय विश्लेषण असले तरीही शेवटी याला भविष्याच्या दृष्टीने राजकीय महत्व आहेत. जर सेना देशातील मोठा राष्ट्रीय पक्ष झाला असता तर सेनेची सत्ता काही इतर राज्यात असती. तसेच राजकीय विश्लेषकाच्या म्हणण्यानुसार देशपातळीवर आज सेनेकडे केंद्रात १२० – १३० खासदार असते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button