breaking-newsराष्ट्रिय

जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीत सीआरपीएफच्या वाहनाला अपघात

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या गाडीवर फुटीरवाद्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे गाडीला अपघात झाला. या अपघातात गाडीतील 19 जवान जखमी झाले आहेत. त्यांना  स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यामध्ये काहींना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दगडफेक करणाऱ्या अज्ञात फुटीरवाद्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रविवारी पहाटेच्या सीआरपीएफचे जवान एका टेम्पोतून श्रीनगरहून दुसऱ्या शहरात जात असताना ही घटना घडली आहे. शाम लाल पेट्रोल पंपाजवळ जवानांची गाडी येताच काही फुटीरवाद्यांनी तुफान दगडफेक केली. यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी उलटली. या अपघातामुळे गाडीतील 19 जवान जखमी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button