breaking-newsआंतरराष्टीय

जम्मू-काश्मीरमध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरूच, 5 जवान शहीद

कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीनंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली

जम्मू-काश्मीरच्या हंडवाडा परिसरात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान आणि दोन स्थानिक पोलिस शहीद झाल्याचं वृत्त आहे. यामध्ये एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाल्याचंही समजतंय. याशिवाय नऊ जवान जखमी झाल्याचीही माहिती आहे. दरम्यान, या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलं आहे. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारपासून चकमक सुरू आहे. कुपवाडामध्ये झालेल्या चकमकीत चार जवान शहीद झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली आहे. घटनास्थळी अद्यापही सुरक्षा दलांकडून ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हंडवाडाच्या बाबागुंड परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर शोधमोहिम सुरू होती. दहशतवादी रहिवाशी इमारतीत लपल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलांचा त्या दृष्टीकोनातून तपास सुरू असतानाच एका इमारतीतून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलानेही चोख प्रत्युत्तर दिलं. मात्र यामध्ये किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही, पण यामध्ये 2 सीआरपीएफ जवान आणि 2 पोलिसांना वीरमरण आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने याबबातचं वृत्त दिलं आहे. इमारतीतीतल सर्व दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button