breaking-newsराष्ट्रिय

जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरीचा डाव उधळला; ५ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर : जम्मू- काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. सैन्याच्या कारवाईत पाच घुसखोरांचा खात्मा करण्यात आला असून परिसरात सैन्याकडून शोधममोहीम राबवली जात आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यात जम्मू- काश्मीरमध्ये सैन्याने शस्त्रसंधी लागू केली आहे. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. गेल्या आठवडाभरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमेवरील गावात राहणाऱ्या ५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर २० हून अधिक जण जखमी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button