breaking-newsराष्ट्रिय

जम्मू- काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू- काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरु असून गेल्या चार दिवसांत चौथ्या दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे.

कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा येथील पोहरुपेठ परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलांनी गुरुवारी संध्याकाळपासूनच परिसरात शोधमोहीम राबवायला सुरुवात केली. रात्री उशीरा एका दहशतवाद्याने सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांच्या जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात त्या दहशतवाद्याचा मृत्यू झाला.

चार दिवसांपूर्वी पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये सैन्याच्या कारवाईत दहशतवादी मसूद अजहरच्या भाच्याचा खात्मा करण्यात आला होता. तर गुरुवारी बडगाममध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. या पाठोपाठ आता चौथ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button