breaking-newsपिंपरी / चिंचवड

जपानहून आलेला पिंपरी-चिंचवडचा एकजण कोरोनाच्या जाळ्यात

पिंपरी |महाईन्यूज|

पुण्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. जपानहून परतलेल्या आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. या नव्या केससह पुण्यातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा आता १६ वर पोहचला आहे. पिंपरी-चिचवडमधील हा ९ वा रुग्ण आहे.

पुण्यात वेगाने वाढत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या पाश्वभूमीवर प्रशासन शहरातील काही भागात कलम १४४ अंतर्गत जमाव बंदी लागू करण्याचा विचार करत आहे. या रुग्णाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाकडून या निर्णयासंदर्भातील हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जपानहून परतेल्या संबंधित रुग्णाची शनिवारी चाचणी घेण्यात आली होती. त्याचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या आकड्यातही भर पडली आहे. कोरोनाचा राज्यातील पहिला रुग्ण हा पुण्यात आढळला होता. दुबईहून परतलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्याच संपर्कातील अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. पुण्यात वाढणाऱ्या आकड्यात पिंपरी-चिंचवड परिसरातील काही रुग्णांचाही समावेश आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयात संबंधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button