breaking-newsराष्ट्रिय

जगनमोहन रेड्डींनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी गुरूवारी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी डीएमके अध्यक्ष एमके स्टॅलिन देखील विजयवाडा येथे दाखल झाले होते. तसेच तेलंगनाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना देखील या कार्यक्रमास हजेरी लावली होती. शिवाय अन्य प्रमुख पक्षांच्या नेतेमंडळींची देखील उपस्थिती होती.

View image on TwitterView image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

YS Jagan Mohan Reddy sworn-in as the Chief Minister of Andhra Pradesh, in Vijayawada.

९१ लोक याविषयी बोलत आहेत

आंध्र प्रदेशच्या विभाजनानंतर जगनमोहन रेड्डी हे राज्याचे दुसरे मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यांनी राज्यपाल ई एस एल नरसिम्हन यांच्या समोर विजयवाडाजवळील आयजीएमसी मैदानात आयोजीत एका भव्य सोहळ्यात दुपारी १२ वाजून २० मिनीटांनी मुख्यमंत्री पद व गोपनियतेची शपथ घेतली. त्यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यपालांना पुष्पगुच्छ दिले. शपथविधी सोहळ्याअगोदर राष्ट्रगीत झाले. या कार्यक्रमानंतर राज्यपाल ई एस एल नरसिम्हन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव हे पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी रवाना झाले. जगमोहन रेड्डींनी एकट्यानेच शपथ घेतली, तर त्यांच्या मंत्रिमंडळाचे गठण ७ जून रोजी होण्याची शक्यता आहे.

जगनमोहन रेड्डी यांनी तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांना देखील आपल्या शपथविधा सोहळ्यास आमंत्रित केले होते. जगन यांच्या वायएसआर काँग्रेसने राज्य विधानसभेच्या १७५ पैकी १५१ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली आहे. याशिवाय त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत २५ पैकी २२ जागांवर विजय मिळालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button