breaking-newsराष्ट्रिय

छत्तिसगढमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश; 18 नक्षलींना अटक

रायपूर – छत्तिसगढमधील दोन जिल्ह्यांत मिळून तब्बल 18 माओवादी नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे सुरक्षा दलांना त्या राज्यात नक्षलवादविरोधी मोहिमेत मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.

बिजापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी 10 नक्षलवाद्यांना पकडण्यात आले. सुरक्षा दलांनी मागील महिन्यात महाराष्ट्राच्या गडचिरोलीमध्ये 39 नक्षलवाद्यांचा खातमा केला. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी नक्षलवाद्यांनी शुक्रवारी बिजापूर बंदचा इशारा दिला होता. त्यापार्श्‍वभूमीवर, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम हाती घेतली. दोन दिवस चाललेल्या या मोहिमेला चांगले यश मिळाले. अटक करण्यात आलेले नक्षलवादी पोलीस पथकांवरील हल्ले आणि लुटीसारख्या गुन्ह्यांत सामील असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

दरम्यान, छत्तिसगढच्या सुकमा जिल्ह्यातही सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात मोहीम राबवली. या मोहिमेवेळी विविध भागांतूून 8 नक्षलवाद्यांना पकडण्यात आले. मागील वर्षी नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात एक पोलीस जखमी झाला होता. त्या स्फोटात अटक करण्यात आलेले नक्षलवादी सामील असल्याची माहिती पुढे आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button