breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छगन भुजबळ यांची विखे-पाटील यांनी घेतली भेट

मुंबई – प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामिनावर मुक्त परंतु केईएम रूग्णालयात उपचार घेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांची आज विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भेट घेतली व प्रकृतीची विचारपुस केली.

भुजबळ यांच्या भेटीसाठी नाशिकचे कार्यकर्ते आणि समर्थकांनी धाव घेतली असतानाच आता राजकीय नेतेही त्यांच्या भेटीसाठी केईएम रूग्णालयात जाताना दिसत आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांनी नुकतीच त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रूग्णालयात जावून भुजबळांची भेट घेतली. यावेळी विखे-पाटील यांनी भुजबळांना पुष्पगुच्छ देवून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button