breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमुंबई

छगन भुजबळ पोहोचले शरद पवारांच्या भेटीला

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते.  मुंबईतल्या सिल्ह्वर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली. जामीन मिळाल्यानंतर छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्यातील ही पहिली भेट आहे. गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना जामीन मिळाल्यानंतर शरद पवारांचा सर्वात पहिला फोन आला होता, अशी माहिती भुजबळांनी दिली होती. दरम्यान, या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

छगन भुजबळ यांनी गुरुवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सांताक्रूज येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांना पंकज भुजबळ आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल विचारण्यात आलं असता शिवसेनेचा आणि आमचा २५ वर्षांपासून चांगला घरोबा आहे. २५ वर्ष आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आहे, ऋणानुबंध राहिले आहेत असं सांगितलं. पडत्या काळात शिवसेनेने दोन चांगले शब्द बोलले असंही त्यांनी सांगितलं. राजकारणात पुन्हा सक्रीय होण्यासंबंधी विचारलं असताना तब्बेत सुधारल्यानंतर लोकांमध्ये जाईन असं त्यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button