breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

छगन भुजबळांच्या भेटीला गिरीष महाजन

  • भेटीचे कारण गुलदस्त्यात : राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण 

मुंबई – राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी छगन भुजबळ यांची आज भेट घेतली. सांताक्रुझमधील भुजबळांच्या निवासस्थानी जाऊन महाजनांनी छगन भुजबळ यांच्यांशी चर्चा केली. गिरीष महाजन यांनी छगन भुजबळांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, दोघांमध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली ते अद्याप गुलदस्त्यात आहे.

भुजबळ तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या भेटीसाठी विविध राजकीय नेत्यांची रिघ लागली आहे. त्यामुळे त्यांची विचारपूस करण्यासाठी गिरीष महाजन भुजबळ यांच्या भेटीला गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

काल शनिवारीच शरद यादव यांनी भुजबळांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली होती. तसेच लालूप्रसाद यादव यांनीही भुजबळांशी फोनवरून चर्चा केली होती. छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांचे राजकीय वजन पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. त्यामुळेच गिरीष महाजनांसोबतच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत चर्चाही सुरु झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button