breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

च-होलीतील चाैघावर बलात्कार प्रकरणी आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी  ( महा ई न्यूज ) –  रोजंदारीसाठी आलेल्या चऱ्होली खुर्दमधील परप्रांतिय कामगाराच्या पत्नीवर आळीपाळीने तरुणांनी बलात्कार केल्याची घटना आळंदी परिसरातील धानोरे येथे घडली. येथील स्थानिक दोघां तरूणांना बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आणि त्यांना साहाय्य करणाऱ्या दोन परप्रांतीय तरूण असे चौघांवर आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आळंदी पोलिसांनी दिली.

याप्रकरणी धानोरे येथील आकाश अनिल झरकर,सचिन अशोक गावडे, सद्दाम अब्दुलबारी हुसेन, सलमान उर्फ नसिब मुबारक अली या चौघांना आळंदी पोलिसांनी आज अटक केली. याबाबत शनिवारी(ता.२७) फिर्याद पिडीत महिलेने दिली. पिडीत महिला आणि तिचे कुटूंबिय चऱ्होली खुर्द येथे रोजगारासाठी आले असून चऱ्होली खुर्द येथे भंगार मालाचा व्यवसाय एका पत्र्याच्या खोलीत करत आहे. यावेळी आरोपी सद्दाम हुसेन याचाही भंगार विक्रिचा व्यवसाय असून भंगार वस्तू विक्रीच्या वादाच्या कारणाहून राग मनात धरून आरोपी सद्दाम हुसेन आणि सलमान अली यांनी गावडे आणि झरकर यांना गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याची फिर्याद पिडीतेने दिली.

चौघा आरोपींनी पिडीत महिलेस ”तु इथे तिघांसोबत का झोपतेस आम्ही तुला तुझ्या नणंदेच्या घरी कुदळवाडी येथे सोडतो” असे सांगून दमदाटी केली. यावर तिने ”हे माझे दिर आणि नातेवाईक आहे ”असे सांगितले. मात्र आरोपींनी चाकुचा धाक दाखवून तिला गाडीवर बसवून कुदळवाडीच्या दिशेने गेले. यावेळी गावडे आणि झरकर यांनी मधेच रस्त्यावर गाडी थांबवून पिडीत महिलेवर आळीपाळीने बलात्कार केला. तर सद्दाम हुसेन आणि सलमान अली यांनी त्यांना गुन्ह्यासाठी मदत केल्याची तक्रार पिडीत महिलेने दिली. आळंदी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरिक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस नाईक अरूण भोसले,मच्छिंद्र शेंडे, महेश साळूंखे यांनी चौघा आरोपींना पकडले असून अधिक तपास आळंदी पोलिस करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button