breaking-newsताज्या घडामोडीपुणे

चोरी प्रकरणी राजभवनातील दोन पोलीस निलंबीत

पुणे – चंदनाच्या चोरी प्रकरणी राजभवनातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे. राजभवनात 30 एप्रिल रोजी पहाटे चंदनाच्या झाडांची चोरी झाली होती. पोलीस उपायुक्त(मुख्यालय) शेषराव सुर्यवंशी यांनी शुक्रवारी रात्री दोघांना निलंबीत केले.
सहायक पोलीस उपनिरीक्षक राजु गायकवाड व पोलीस कर्मचारी कृष्णा दिसले अशी निलंबीत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. हे दोन्ही कर्मचारी मुख्यालयात कार्यरत होते. घटनेच्या दिवशी त्यांची नेमणूक राजभवनात करण्यात आली होती. यावेळी चोरट्याने पाण्याच्या टाकीजवळील पाच चंदनाच्या झाडांची चोरी केली. निलंबीत कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button