breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

“…चोरी करणारा जज म्हणून बसला तर केसचा निकाल काय लागायचा” – शरद पवार

पुणे | महाईन्यूज

माझं सरकार पारदर्शक होतं, असं मुख्यमंत्री सांगतात. कारण, माझ्या सरकारवर कोणी आरोप केले नाहीत, मग धनंजय मुंडे यांनी 20 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले, त्यांच्यापैकी काहींची उमेदवारीची तिकीटं का कापली गेली, “चोरी करणारा जज म्हणून बसला तर निकाल काय लागायचा केसचा”, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दौंड येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांना लगावला.

शरद पवार पुढे म्हणाले की, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २० मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं दिली होती. मात्र, मी तपासलं यात काहीही नाही, अशी कबुली मुख्यमंत्री देतात. आम्ही तिसऱ्या माणसाकडे तपासायला द्या, असे सांगितले. मात्र, त्यांनी तपासू दिली नाहीत. यांनी जर चुकीचं काही केलं नसेल, तर मग मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना पुन्हा का तिकीटं दिली नाहीत? पाच मंत्र्यांना तिकीटं दिलं नाहीत. का त्यांना गाळलं? कुठेतरी काहीतरी गडबड आहे, म्हणूनच त्यांना तिकीटं दिलं नाहीत ना. ज्यांना तुम्ही तिकीटं देवू शकत नाही. त्यांच्यावर कारवाई करत नाही, आणि आम्हाला सांगतात आमचं सरकार पारदर्शक, अहो यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? असा सवालही शरद पवार यांनी उपस्थित केला.

या सरकारला राज्यातील लहान घटकांची चिंता नाही. यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याउलट केंद्रसरकारने देशाच्या धनिष्टांचे कर्जाचे ओझे माफ करून ८२ हजार कोटींचे कर्ज फेडले. आज संपूर्ण देशात शेतीची अवस्था बिकट आहे, हे या राज्यकर्त्यांच्या नजरेत कसे येत नाही? असा संतप्त सवालही शरद पवार यांनी सरकारला केला. याचबरोबर दौंड विभागात आपण कारखानदारी उभी केली. याचा फायदा इथल्या लोकांना झाला. पण आजच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या चुकीच्या धोरणामुळे इथल्या कामगारांना महिनोमहिने पगार मिळत नाही. यामुळे इथली अर्थव्यवस्था बिघडली आहे. तरीदेखील तुम्ही मतांचा जोगवा मागायला कसे येतात? असेही ते सरकारला उद्देशुन म्हणाले.

यावेळी त्यांनी समाज पुढे न्यायचा असेल तर स्त्री-पुरुष, तरुण असो, दलित,ओबीसी, आदिवासी या सगळयांना घेऊन पुढे जाता आले पाहिजे. हे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस करत आहे . मात्र हे काम भाजप करताना दिसत नाही. समाज सुधारण्याची वृत्ती ज्यांच्याकडे नाही, त्यांना आम्ही मताचा पाठिंबा देणार नाही. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे, असे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button