breaking-newsराष्ट्रिय

चोक्‍सीला अटकेपासून मिळालेले संरक्षण मागे

नवी दिल्ली -पीएनबी घोटाळा करून देशाबाहेर पसार झालेला हिरे व्यापारी मेहुल चोक्‍सी याला अटकेपासून देण्यात आलेले संरक्षण आज दिल्ली उच्च न्यायालयाने काढून घेतले. न्यायालयाच्या दोन पीठांपुढे चोक्‍सीशी संबंधित स्वतंत्र सुनावण्या झाल्या. यावेळी दिल्ली पोलीस आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चोक्‍सी तपासकामी सहकार्य करत नसल्याचे सांगितले. मनी लॉण्डरिंग प्रकरणी चोक्‍सीच्या कंपनीच्या ज्वेलरी स्टॉकच्या जप्तीचेही ईडीने जोरदार समर्थन केले. चोक्‍सी हा पीएनबी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नीरव मोदीचा मामा आहे. त्या दोघांनीही चालू वर्षी जानेवारीत देशाबाहेर पलायन केले. त्यांनी केलेल्या घोटाळ्याचा तपास ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय यंत्रणा करत आहेत. आतापर्यंत त्या दोघांची प्रचंड मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button