breaking-newsआंतरराष्टीय

चीनमध्ये इस्लामिक संघटनेकडून मशिदींवर राष्ट्रध्वज फडकावण्याचे आवाहन

पेईचिंग: चीनमधील एका इस्लामिक संघटनेने देशातील सर्व मशिदींवर राष्ट्रध्वज फडकावण्याचे आवाहन केले आहे. एवढच नव्हे तर प्रत्येकाच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होण्यासाठी चीनचं संविधान आणि समाजवादी विचारांचा अभ्यास करण्याचा सल्लाही या इस्लामिक संघटनेने दिला आहे.

चिनी इस्लामिक असोसिएशनने हे आवाहन केले आहे. या संघटनेने त्यांच्या संकेतस्थळावर त्याबाबतचे पत्रही पोस्ट केले आहे. देशभरातील इस्लामिक संघटना आणि मशिदीवरील प्रमुख ठिकाणी राष्ट्रध्वज फडकावलाच पाहिजे, असे आवाहन करण्यात आले असल्याचे वृत्त चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’ या वृत्तपत्राने दिले आहे. या पत्रात चीनची संस्कृती आणि परंपरा जाणून घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात चीनने एक श्वेतपत्रिका काढली होती. त्यानुसार चीनमध्ये २ कोटी मुस्लिम असल्याचे उघड झाले होते. त्यात उइगर मुस्लिमांची संख्या अधिक असल्याचे नमूद करण्यात आले होते. चीनमध्ये सध्या एकूण ३५ हजार मशिदी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button