breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

चीनमधील कम्युनिस्ट सरकारने 16 हजारांवर मशिदी पाडल्या

उइगर मुस्लिमांचा सफाया करण्याचे काम चीनमधील कम्युनिस्ट सरकारने हाती घेतले आहे. गेल्या काही वर्षांत उइगर संस्कृती व इतिहास नष्ट करण्यासाठी १६ हजारांहून जास्त मशिदी, मजार व इतर धार्मिक स्थळे नष्ट करण्यात आली आहेत. काहींमध्ये प्रवेशबंदी आहे.

ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पाॅलिसी इन्स्टिट्यूटच्या (एएसपीआय) एका अहवालानुसार चीनच्या शिनजियांग प्रांतात २०१७ नंतर ८५०० हून जास्त मशिदी पूर्णपणे पाडण्यात आल्या आहेत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. नेथन रुजर यांच्या नेतृत्वाखाली टीमने मुस्लिमांची धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणे नष्ट केली आहेत. हा उइगर संस्कृतीला मिटवण्याचा जाणूनबुजून केलेला कट आहे. १९६६ मध्ये माओत्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली अनेक धार्मिक ठिकाणे व मशिदी पाडण्यात आल्या हाेत्या.

एएसपीआयचा अहवाल शिनजियांगमधील ५३३ मशिदींच्या साइटच्या नसून निवडीवर आधारित आहे. वेगवेगळ्या काळात विविध ठिकाणांवर घेण्यात आलेल्या उपग्रहाच्या छायाचित्रात बदल स्पष्ट दिसून आला आहे. अनेक ठिकाणांवर मशिदींना पाडून उद्याने व क्रीडा मैदाने तयार करण्यात आली. शिनजियांग प्रांतात एका मशिदीला पाडून तेथे सार्वजनिक शाैचालय तयार करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button