breaking-newsमहाराष्ट्र

चिमुकल्या “सलोनी’च्या आयुष्याचा दोर बळकट

बाबा, तुम्ही घाबरु नका
पोटात लोखंडी रॉड घुसल्याने गंभीर जखमी झालेल्या पोट्याच्या गोळ्याची अवस्था पाहुन बापाचा धीर सुटत असताना आठ वर्षाची जखमी अवस्थेतील सलोनीच बाबा, घाबरु नका, मला काही नाही होणार असा धीर देत होती. अशा अवस्थेतही कोणताही आरडा-ओरडा न करता कुटुंबियांनाच आधार देणाऱ्या सलोनीच्या या शब्दांनी कुटुंबियांसह नातेवाईकांनही आपल्या भावना आवरता आल्या नाहीत.

 

  • नित्रळ येथील थरारक घटना : बारा फुटावरून पडून पोटात घुसला लोखंडी रॉड; उपचार सुरू

परळी – वडिलांसोबत कौले लावण्यासाठी घरावर चढलेली आठवर्षीय चिमुकली पायाखालची पट्टी तुटल्याने घरावरुन खाली पडली. दरम्यान, खाली बैल बांधण्यासाठी रोवलेल्या लोखंडी मेखेवरची ती पडल्याने लोखंडी मेख तिच्या पोटातच घुसली. मात्र, आयुष्याची दोर बळकट असल्याने ती बचावली असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सलोनी रामचंद्र भगत असे या चिमुकलीचे नाव आहे. ही घटना परळी खोऱ्यातील नित्रळ या गावात शनिवारी घडली.

कातवडी येथील चंद्रकांत भगत हे नित्रळ येथे आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहेत. भगत हे सामान्य शेतकरी आहेत. पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून शनिवारी त्यांनी आपले कौलारू घर दुरुस्तीला काढले होते. त्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासूनच त्यांनी सुरुवात केली होती. भगत यांना सलोनी नावाची आठ वर्षांची मुलगी आहे. मीही घरावरील कौले लावणार असा हट्ट सलोनीने वडिलांकडे केला. मुलीच्या हट्टापुढे वडिलांनीही हात टेकले आणि सलोनीला त्यांनी आपल्यासोबत घरावर नेले. सलोनीही वडिलांसोबत कौले लावण्याचे काम करु लागली. घरावर ज्याठिकाणी सलोनी उभी राहिली होती, त्याठिकाणी तिच्या पायाखाली असलेली लाकडी पट्टी अचानक तुटली आणि क्षणार्धात सलोनी घरावरुन सुमारे 12 फुट खाली पडली. दुर्दैवाने खाली असलेल्या लोखंडी रॉडवरच सलोनी पडली आणि बैल बांधण्यासाठी रोवण्यात आलेला लोखंडी रॉड सलोनीच्या पोटात घुसला. आपल्या डोळ्यासमोर आपल्या मुलीला खाली पडताना पाहून वडिलांच्या काळजाचे अक्षरश: पाणी झाले. क्षणार्धात घडलेल्या घटनेने वडिल चंद्रकांत भगत हे भांबावून गेले, कसेबसे घरावरुन खाली आले. पोट्याच्या गोळ्याला रक्ताच्या थोरोळ्यात पडलेले पाहुन त्यांचाही धीर सुटला. तात्काळ त्यांनी सलोनी उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने सलोनीला पुन्हा सातारा हॉस्पिटलला दाखल केले. नशिबाची दोरी बळकट असल्यामुळेच सलोनी या दुर्दैवी घटनेतून बचावली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button