breaking-newsताज्या घडामोडीपुणे

चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून तरुणीची 15 लाखाची फसवणूक

पुणे,- चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून एका 31 वर्षाच्या तरुणीची 15 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. पैसे परत मागितल्यावर संबंधीत तरुणीला जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी एका 21 वर्षाच्या तरुणावर फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे .
तुषार मधुकर देशमुख (21,रा.शिवाजी चौक, बदलापुर, जि.ठाणे) असे आरोपीचे नाव आहे.
त्याने या तरुणीला ऑक्‍टोबर 2017 ते जानेवारी 2018 दरम्यान पुण्यात ठिकठिकाणी भेट घेऊन चित्रपटात अभिनेत्रीचे काम देण्याचे आमिष दाखवले. तसेच दोघे मिळुन पुण्यात शेअर मार्केटचे कार्यालय खोलू असा बहाणाही केला. यासाठी त्याने तीच्याकडून 15 लाख 70 हजार 400 रुपये घेतले. यानंतरही चित्रपटात काम न देता तसेच शेअरमार्केटचे कार्यालयन न खोलता फसवणूक केली. तीने पैसे परत मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक के.बी.जाधव तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button