breaking-newsताज्या घडामोडीपुणे
चिंताजनक : पुण्यातील कात्रज डेअरीमध्ये कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू; १६ बाधित तर अन्य ५० जण क्वारंटाईन
पुणे । प्रतिनिधी
राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशात गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात देखील कोरोनाने कहर केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे कात्रज दूध डेअरी येथील एका कर्मचार्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
पुणे कात्रज दूध डेअरी येथील एका कर्मचार्याचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर १६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. पुणे कात्रज दूध डेअरी येथील जवळपास ५० कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या जेवढे ग्राहक कात्रजचे दूध घरी घेत असतील त्यांनी काही दिवसांसाठी खबरदारी घ्यावी. दुध घेताना काळजी घ्यावी, पिशव्या धुवूनच घरात घ्यावी तसेच दूध तापवून घ्यावी. अशी खबरदारी घेतल्यास आपण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखू शकतो.