breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

चिंताजनक : देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर; बेरोजगारीही भयावह

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी) च्या आकडेवारीने खळबळ

राज्यातील सत्ताधारी महा विकास आघाडीची अग्निपरीक्षा

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आपले जीवन क्षणार्धात संपवत आहे. देशातील अग्रेसर म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी)च्या आकडेवारीनुसार, देशात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. त्यामुळे राज्यात नव्याने स्थापन झालेल्या महा विकास आघाडीच्या सरकारला आगामी काळात अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

          शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रस आघाडीत घटक पक्षांनी एकत्रित येवून राज्यात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगेचच राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. पण, त्यामुळे शेतकऱ्यांचा आत्महत्या थांबतील का? हा प्रश्न आहे.

          देशातील एकूण आत्महत्यांच्या घटनांमधील सर्वाधिक ३४.७ टक्के महाराष्ट्रात, कर्नाटकमध्ये २३.२ टक्के, तेलंगनामध्ये ८.८ टक्के आणि आंध्रप्रदेशमध्ये ६.४ टक्के आणि ६.३ टक्के मध्य प्रदेशमध्ये आत्महत्यांची नोंद दिसत आहे.

          त्यामुळे भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार कितपत यशस्वी झाला? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच, महा विकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना आत्महत्येच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कोणत्या उपाययोजना करणार? त्याचा फायदा होणार की शेतकरी आणखी संकटात सापडणार आहे. या सर्व आव्‍हानात्मक परिस्थितीतून मार्ग काढताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारची कसोटी लागणार आहे.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील गुन्हेगारीसंदर्भातील आकडेवारी जतन केली जाते. या संस्थेच्या आकडेवारीनुसार देशातील बेरोजगारांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये ३.६ टक्के वाढ झाली आहे. २०१८  मध्ये देशात १ लाख ३४ हजार ५१६ आत्महत्यांच्या घटनांची नोंद करण्यात आली. तसेच, २०१७ मध्ये ही संख्या १ लाख २९ हजार ८८७ इतकी होती.

***

बेरोजगारांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर…

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो (एनसीआरबी)च्या आकडेवारीनुसार २०१८ मध्ये रोज ३५ बेरोजगार आत्महत्या करीत आहेत. प्रत्येक दोन तासाला किमान ३ बेरोजगार आयुष्यांचा अंत करुन घेत आहेत. विशेष म्हणजे, देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्येपेक्षा बेरोजगारीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.  २०१८ मध्ये केरळमध्ये सर्वाधिक १ हजार ५८५, तामिळनाडूमध्ये १ हजार ५७९, महाराष्ट्रात १ हजार २६०, कर्नाटकमध्ये १ हजार ९४ आणि उत्तर प्रदेशमध्ये ९०२ बेरोजगारांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button