breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

चिंचवड विधानसभेचे ‘अपक्ष’ राहुल कलाटे यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीची पंचतारांकित बैठक

– आमदार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात राष्ट्रवादी एकवटली?
– प्रशांत शितोळे यांची नाराजी दूर; पक्षाच्या बैठकीला उपस्थित

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी :
चिंचवड विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या समर्थनार्थ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी वाकड येथील सयाजी हॉटेलमध्ये गुरूवारी महत्त्वपूर्ण बैठक घेतली.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक राजू मिसाळ, प्रवक्ते फजल शेख आदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे इच्छुक उमेदवार प्रशांत शितोळे यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे शहर राष्ट्रवादी आणि पक्षाचे नेते अजित पवार यांनी अपक्ष उमदेवार राहुल कलाटे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांच्याविरोधात सर्व विरोधकांची मोट बांधण्यासाठी कलाटे यांनी मोर्चेबांधणी केली आहे.
***
प्रशांत शितोळे यांची तलवार अखेर म्यान…
चिंचवडमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी स्थायी समिती सभापती आणि शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे इच्छुक होते. मात्र, पक्षाने एबी फॉर्म वेळेत न दिल्यामुळे शितोळे यांचा अर्ज बाद झाला होता. यावर नाराज होवून शितोळे यांनी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. दरम्यान, गुरुवारी राहुल कलाटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला प्रशांत शितोळे उपस्थित होते. त्यामुळे शितोळे यांनी नाराजी दूर झाल्याचे बोलले जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button