पिंपरी / चिंचवड

चिंचवड लिंकरोडवर साडेतीन लाखांचा बेकायदा मद्यसाठा जप्त

पिंपरी:  राज्य उत्पादन शुल्क विभागाने पिंपरी-चिंचवड लिंकरोडवर साडे तीन लाख रुपये किंमतीचा विदेशी मद्याचा बेकायदा साठा एका वाहनातून जप्त केला. याप्रकरणी वाहन चालकाला अटक केली आहे. विजय सुरेश ठाणगे (वय 34, रा. आदर्शनगर, श्रीरामपुर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी वाहनांची तपासणी करत असताना, चिंचवड लिंकरोडवर पांढरी महिंद्रा पीक अप (क्र.एमएच17बीडी 1908) हे वाहन थांबवून तपासणी केली. या वाहनाच्या मागील हौद्यात प्लास्टिकचे रिकामे क्रेटस्‌ आढळले. त्यानंतर बारकाईने पाहणी केली असता, छुपा कप्पा आढळून आला. यामध्ये मध्यप्रदेशात तयार झालेल्या एकूण 3 लाख 58 हजार 800 रुपये किंमतीच्या 2,424 बाटल्या जप्त केल्या.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय आयुक्त अर्जुन ओव्हळ, अधिक्षक मोहन वर्दे, उपअधिक्षक श्री. फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी विभागाचे निरीक्षक संजय ढेरे, उपनिरीक्षक सूरज दाबेराव यांनी मंगळवारी (11) ही कारवाई केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button