breaking-newsताज्या घडामोडीपुणे

चिंचवडमध्ये सहा अनधिकृत बांधकामांवर कारवाई

पिंपरी – महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रिय कार्यालयअंतर्गत प्रभाग क्र. १७ व १८ चिंचवड मधील एकूण सहा अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमण विरोधी कारवाई करण्यात आली.

महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने अनधिकृत पत्राशेड व आरसीसी बांधकामावर कारवाई सुरू केली आहे. चिंचवड प्रभाग क्रमांक १७ व १८ मध्ये गुरूवारी (दि. 5) मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. या कारवाईत एक वीट बांधकाम, दोन आरसीसी, तीन पत्राशेड अशा एकूण सहा बांधकामांवर कारवाई करण्यात आली.

कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता केशवकुमार फुटाणे व इतर कनिष्ठ अभियंता, बीट निरिक्षक यांचे पथकाने केली. सदर कारवाई मनपा पोलीस व चिंचवड पोलीस ठाण्याचा बंदोबस्त तैनात होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button