पिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर

 

पिंपरी – योगदान प्रतिष्ठन आणि 7 ऑरेंज हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महासाधू मोरया गोसावी स्टेडियम केशवनगर येथे तीन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिर भरविण्यात आले आहे. शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने केले आहे.

 

शिबिराचे उद्घाटन प्रभाग 18, चिंचवडचे  नगरसेवक सुरेश भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक राजेंद्र गावडे, महाराष्ट्र विद्युत समितीचे सदस्य मधुकर बच्चे, भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या कांता मोंढे, इंद्रायणी बँकेचे पोपट पवार, तात्या मुंजुगडे, राठोड, पंजाबराव मोंढे, सीताराम सुबंध, कैलाश राणे, हरि मोहिते, योगेश गागरे आदी उपस्थित होते.

 

हे शिबिर दि. 30 मे ते 1 जूनपर्यंत सुरू राहणार आहे. डॉ. मनोज मेनन, राहुल त्रेहान, शुभांगी पोळ आदी डॉक्टरांची टीम तीन दिवस कार्यरत राहाणार आहे. हिमोग्लिबिन, रक्तदाब, ईसीजी आदी तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच, डॉक्टरांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. प्रभागातील जास्तीतजास्त नागरिकांनी याचा फायदा घ्यावा, असे आवाहन नगरसेवक भोईर यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button