breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडमध्ये ‘एक तोचि नाना’ प्रकट मुलाखत

कलारंग” संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिन, अभिनेते नाना पाटेकर यांची प्रकट मुलाखत

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

 “कलारंग” सांस्कृतिक कला संस्था, पिंपरी-चिंचवड च्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक २२ जानेवारी २०२० रोजी “एक तोचि नाना” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सुप्रसिध्द सिने नाटय अभिनेते व नाम फांऊडेशनद्वारे सामाजिक क्षत्रात कार्यरत असणारे नाना पाटेकर यांचा सांस्कतिक व सामाजिक प्रवास उलगडणारी प्रकट मुलाखत होणार आहे. ही मुलाखत प्रसिध्द मुलाखतकार व संवादक श्री. समीरन वाळवेकर घेणार आहेत, अशी माहिती कलारंग संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

“कलारंग” सांस्कृतिक कला संस्था पिंपरी-चिंचवड, परिसरात सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या २० वर्षापासून कार्यरत असून संस्थेचा शहरातील सांस्कृतिक वाटचालीत मोठा वाटा आहे. संस्थेच्या माध्यमातून गला १५ १ मराठी चित्रपट नाटय क्षेत्रातील अनेक दिग्गज कलावंतांना सन्मानित करण्यात आले असून प्रामुख्यान विक्रम गोखले,सचिन पिळगांवकर,अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, रिमा लागू, अजय अतुल, मृणाल कुलकर्णी,कुलदिप पवार यांसारख्या अनेक कलावंतांची नावे घ्यावी लागतील. यावर्षी कलारंग संस्थेच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाना पाटेकर यांचा  जीवनपट शहरवासियांसमोर उलगडण्याचा प्रयत्न आहे. हा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी ५:०० वाजता. चिंचवड येथील  प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. 

हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून या कार्यक्रमात काही स्थानिक कलाकार व सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. पी. डी. पाटील, (सर्वेसर्वा डॉ. पी. डी. पाटील प्रतिष्ठान) मा. आमदार लक्ष्मण जगताप, खा. मा. अमर साबळे, मा. आमदार महेश लांडगे, मा. सचिनजी पटवर्धन (अध्यक्ष, लेखा समिती), मा. सदाशिव खाडे (अध्यक्ष PCNDTE ), सौ. माई ढोरे (महापौर), मा. भाऊसाहेब भोईर (अध्यक्ष अ.भा.ना.प), मा.सौ. उमाताई खापरे, (भाजपा नेत्या), मा. तुषार हिंगे (उपमहापौर), मा. एकनाथ पवार (पक्षनेते, पिं.चिं.), मा. विलास मडेगिरी (अध्यक्ष, स्थायी समिती), मा. श्री. मधुकर बाबर, (अध्यक्ष, जिजामाता पतसंस्था) उपस्थित राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button