breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडच्या वैभवात पडणार भर; या ठिकाणी होणार ‘हेरिटेज प्लाझा’

पिंपरी |महाईन्यूज|

चिंचवड येथील मंगलमूर्ती वाडा, चापेकर शिल्पसमूह, मोरया गोसावी समाधी मंदिर, थेरगाव बोट क्‍लब परिसरात ‘हेरिटेज प्लाझा’ करून सुशोभिकरण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पवना नदीकाठ हिरवाईने नटलेला आहे. या नदीवर थेरगावला बंधारा बांधलेला आहे. त्यात बोटिंग सुरू असते. ही सर्व स्थळे एकमेकांना जोडून परिसर सुशोभित केला जाणार आहे. यामुळे चिंचवडच्या वैभवात भर पडणार आहे. यासाठी सुमारे बारा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामाची निविदा प्रक्रिया गेल्या वर्षीच पूर्ण झाली असून लवकरच कामाला प्रारंभ होणार आहे.

चिंचवड येथील महासाधू मोरया गोसावी यांचे संजीवन समाधी मंदिर आहे. त्यालगत प्रशस्त घाट बांधला आहे. मंदिराच्या मागील छोट्या मंदिरातून थेट नदी पात्रात जाता येते. मंदिरा शेजारी नदीलगत जिजाऊ उद्यान महापालिकेने विकसित केले आहे. शिवाय, मंदिरापासून अवघ्या काही फुटांवर मंगलमूर्ती वाडा आहे.

मंगलमूर्ती वाड्यापासून काही अंतरावर चापेकर वाडा आहे. तेथून जवळच मुख्य रस्त्यावर चापेकर बंधूंचे शिल्पसमूह आहे. शहराचा इतिहास यामुळे उजळून निघतो. या शिल्पसमूहामुळेच चिंचवड मधील हे ठिकाण चापेकर चौक म्हणून ओळखले जाते. या चौकात आठ रस्ते एकत्र येतात. त्यामुळे नेहमीच वर्दळ असते.

थेरगावच्या पवना नदीवर बंधारा बांधला आहे. नदीच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडी आहे. बंधाऱ्याच्या शेजारी महापालिकेने उद्यान उभारले आहे. बंधाऱ्यामुळे जलाशय निर्माण झालेले असून रावेतपर्यंत पाणलोट क्षेत्र आहे. या बंधाऱ्यात बोटींग सुविधा उपलब्ध असल्याने यालाच बोटक्‍लब असे म्हटले जाते. हे सर्वस्थळे सुशोभिकरणाने एकमेकांना जोडले जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button