breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवडगावात श्री मोरया गोसावी महोत्सव आजपासून उत्सव

पिंपरी |महाईन्यूज|

श्रीमन्‌ महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव आजपासून साजरा होणार आहे. एक ते चार जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात केवळ धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. समाधी सोहळ्याचे 459 वे वर्ष आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गोडसे यांना ‘श्री मोरया गोसावी जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्ट, महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने हा महोत्सव घेतला जात आहे.

याविषयी सविस्तर माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार जगन्नाथ महाराज देव यांनी दिली. जगभरासह महाराष्ट्रात कोरोना असल्याने यंदा महोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय विश्‍वस्तांनी घेतला आहे. दरवर्षी दहा दिवस महोत्सव असतो. सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, उद्‌घाटन सोहळा होणार नाही. समाधी मंदिर आवारात मर्यादित लोकांमध्ये सर्व धार्मिक कार्यक्रम होतील.

कार्यक्रम असे :
शुक्रवार दि. 1 जानेवारी

  • सकाळी 6 : चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या हस्ते महापूजा
  • सकाळी 8 : वीस साधकांच्या उपस्थितीत चरित्र पठण
  • सायंकाळी 5 : ज्ञानेश्‍वर मुरलीधर कपलाने महाराज यांचे कीर्तन.

शनिवार दि. 2 जानेवारी

  • सकाळी 9 : रक्तदान शिबिर
  • सकाळी 11 : नेत्र चिकित्सा शिबिर व अल्प दरात चष्मे वाटप

रविवार दि.3 जानेवारी

  • सायंकाळी 5 : श्री मोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार वितरण

सोमवार दि. 4 जानेवारी

  • पहाटे 4.30 : श्री मोरया गोसावी संजीवन समाधीची महापूजा
  • सकाळी 8 : मोरया गोसावी चरित्र पठण. महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पुणे जिल्हाध्यक्ष सतीश महाराज काळजे यांचे काल्याचे कीर्तन
  • रात्री 10 : समाधी मंदिर आणि मंगलमूर्ती वाड्यात धूप आरती
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button