चर्चेआधी ट्रम्प यांनी केली अबे आणि मून जे यांच्याशी चर्चा
वॉशिंग्टन – आजच्या बहुचर्चीत भेटीच्या आधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिंझो अबे आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे यांच्याशी दूरध्वीनीवरून सविस्तर चर्चा करून त्यांच्याकडून फीडबॅक घेतला. अमेरिकेच्या अध्यक्षांनी उत्तर कोरियाबरोबर चर्चा करण्याच्या प्रस्तावाला जपान आणि दक्षिण कोरिया यांनी पहिल्यापासून समर्थन दिले आहे. या संबंधात अमेरिकेचे विदेश मंत्री माईक पोम्पेओ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की कोरियन द्विपकल्पात पुर्ण, व्यापक आणि खात्रीचे निशस्त्रीकरण व्हावे यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे.
हे निशस्त्रीकरण आपल्यासाठी नुकसानकारक आहे अशी भीती उत्तर कोरियाला वाटताकामा नये याचीही दक्षता आम्हाला घ्यावी लागणार आहे. निशस्त्रीकरणाच्या प्रकियेच्या संबंधात आम्हाला या आधीही फसवण्यात आले आहे. तथापी या चर्चेचे परिणाम चांगले निघतील यासाठी आम्ही आधीपासूनच काळजी घेत आहोत. त्यात आम्हाला यश मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.या बाबतीत दोन्ही देशांना एकमेकांवर विश्वास ठेवाव लागेल असे ते म्हणाले.