breaking-newsराष्ट्रिय

चंद्राबाबू नायडूंचे अलिशान निवासस्थान होणार जमीनदोस्त

आंध्र प्रदेशचे मुख्यंमत्री वायएस जगनमोहन रेड्डी यांनी माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा ‘प्रजा वेदिका’ हा अलिशान बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत. मंगळवारपासून ही इमारत पाडण्यास सुरूवात होणार आहे. आतापर्यंत या इमारतीत चंद्राबाबू राहत होते. काही दिवसांपूर्वीच चंद्राबाबूंनी मुख्यमंत्री रेड्डी यांनी पत्र लिहून ही इमारत पाडू नये व या इमारतीस विरोधी पक्ष नेत्याचे शासकीय निवासस्थान घोषित करावे, अशी मागणी केली होती.

ANI

@ANI

Andhra Pradesh CM YS Jagan Mohan Reddy orders demolition of ‘Praja Vedika’ building, demolition of the building to begin day after tomorrow. (file pic)

९० लोक याविषयी बोलत आहेत

मात्र मुख्यमंत्री रेड्डी यांनी त्यांची मागणी फेटाळली. यानंतर शनिवारीच शासकीय अधिकाऱ्यांनी या अमरावती स्थित असलेल्या इमारतीचा ताबा घेतला. चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष असलेल्या तेलगू देसम पार्टीने याला सूड बुद्धीने केलेली कारवाई असे म्हटले आहे. टीडीपीने आरोप केला आहे की, सरकारने माजी मुख्यमंत्र्याबद्दल जरा देखील आदर दाखवल नाही.

जेव्हापासून आंध्र प्रदेशचे प्रशासन हैदराबादहून अमरावतीत स्थलांतरित झाले. तेव्हापासून कृष्णा नदी काठी उंदावल्लीतील या इमारतीत माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राहत होते. हैदराबाद आता तेलंगणची राजधानी आहे. प्रजा वेदिका इमारतीची उभारणी आंध्र प्रदेश राजधानी क्षेत्र विकास प्राधिकरणाद्वारे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या रूपात करण्यात आली होती. यासाठी तब्बल पाच कोटी रूपये खर्च करण्यात आले होते. चंद्राबाबू नायडू या ठिकाणीच पक्ष नेत्यांच्या बैठकी घेत असत.

नायडूंनी या महिन्याच्या सुरूवातीसच मुख्यमंत्री रेड्डींना पत्र लिहून या इमारतीचा वापर बैठका घेण्यासाठी करू द्यावा, अशी परवानगी मागितली होती. शिवाय विरोधी पक्ष नेत्याचे निवासस्थान म्हणुन देखील या इमारतीस घोषित करावे अशी देखील मागणी केली होती. मात्र सरकारने या इमारतीस ताब्यात घेण्याचा निर्णय शुक्रवारीच घेतला आणि घोषणा केली की जिल्हाधिकाऱ्यांचे संमेलन या ठिकाणी होईल जे की या अगोदर राज्य सचिवालयात होणार होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button