breaking-newsव्यापार

घरातलं सोनं विकताना भरावा लागतो एवढा टॅक्स

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन असतानाही सोन्याची झळाळी मात्र कायम आहे. सध्या सोन्याचा दर 10 प्रति ग्रॅमसाठी 47 हजार रुपये झाला आहे. सध्या शेअर मार्केटमध्ये अनिश्चिततेचं वातावरण असताना अनेक गुंतवणुकदार, ग्राहक गुतंवणूकीसाठी सोन्याला प्राधान्य देत आहेत. सोनं एक सुरक्षित गुंतवणूक असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणं आहे. पण अनेकांना सोनं खरेदी केल्यानंतर ते विकायचं असल्यास त्यावर लागणाऱ्या टॅक्सबाबत माहिती नसते. आयकर विभागाने यासंदर्भात अनेक नियम केले आहेत.

परंतु हे नियम केवळ दुकानातून खरेदी केलेल्या सोन्यावरच लागू आहेत. जर एखाद्या व्यक्तीने डिजिटल सोनं खरेदी केली असल्यास त्यावर नियम लागू नाही. मुंबईतील कर आणि गुंतवणूक सल्लागार बलवंत जैन यांनी सांगितलं की, सोन्याचे दागिने भांडवल मालमत्ता मानली जातात आणि विक्रीवरील नफा हा भांडवल नफा मानला जातो. त्याच वेळी, दाग-दागिन्यांची विक्री सोनारांसाठी हे व्यवसाय उत्पन्न मानले जाते.

जे लोक खरेदी केलेलं सोनं 36 महिन्यांनंतर विकतात, त्यांना 20.80 टक्के टॅक्स भरावा लागतो. तर यापेक्षा कमी वेळेत विकणाऱ्यांना त्यांच्या मूळ किंमतीवरच टॅक्स भरावा लागतो. 

जर सोन्याचे दागिने भेटवस्तू स्वरुपात मिळाल्यास आणि त्याची किंमत 50000 रुपयांहून कमी असल्यास, त्यावर कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागू होत नाही. तर भेटवस्तूची किंमत 50000 रुपयांहून अधिक असल्यास, अशा भेटवस्तू स्वरुपातील सोन्यावर टॅक्स लावला जातो.

एखाद्या व्यक्तीला त्याच्या आई-वडिलांकडून, भाऊ-बहिणीकडून सोनं भेटवस्तू रुपात मिळाल्यास त्यावर टॅक्स लागू होत नाही. लग्नात मिळालेल्या सोन्यावरही सूट देण्यात येते. त्याशिवाय वारसा हक्क्कात मिळालेल्या सोन्यावरही सूट देण्यात येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button