breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

घणसोलीत ई-टॉयलेटमध्ये शक्तीशाली स्फोट, परिसरात भितीचे वातावरण

नवी मुंबईत घणसोली येथील ई-टॉयलेटमध्ये शुक्रवारी दुपारी मोठा स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या स्फोटात कोणीही जखमी झालेले नाही. सिम्पलेक्स गृहनिर्माण सोसायटीजवळच्या मोकळया मैदानातील ई-टॉयलेटमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने परिसरात भितीचे वातावरण झाले होते.

स्फोटानंतर काही वेळाने नागरिकांनी घटनास्थळाच्या दिशेने धाव घेतली. या स्फोटात ई-टॉयलेट जळून खाक झाले आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला ते अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. सध्या दिवाळीचे दिवस असल्याने कोणी खोडकरापणा करण्यासाठी एखादा फटका ठेवला असावा अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. पण फटाक्याने अख्खे टॉयलेट कसे काय जळू शकते. कुठल्या कटाची तर ही पूर्वतयारी नाही ना ? या अंगाने सुद्धा तपास होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button