महाराष्ट्र

घटस्फोटासाठी स्काईपवर जबाब नोंदविण्यास हिरवा कंदील

मुंबई – परदेशात वास्तव्यास असणाऱ्या महिलेला संमतीने घेतल्या जाणाऱ्या घटस्फोटाच्या प्रक्रियेत स्काईपच्या माध्यमातून जबाब नोंदवण्याची मुभा उच्च न्यायालयाने दिली. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी ही परवानगी देल्याने परदेशात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन भारतातील एखादे काम पूर्णत्वास नेणे सोपे झाले आहे.

सोळा वर्षापूर्वी लग्नाच्या बंधनात अडकलेल्या आणि दोन वर्षांपूर्वी परस्परांपासून अलिप्त झालेल्या दाम्पत्याने सामोपचाराने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांनी कुटुंब न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. मात्र कुटूंब न्यायालयाने त्या महिलेला जबाब नोंदवण्यासाठी प्रत्यक्ष हजर राहण्याचे निर्देश दिले. भारतात येऊन जबाब देणे शक्‍य नसल्याने त्या महिलेने स्काईपद्वारे जबाब नोंदवण्यास परवानगी मागितली होती. मात्र, कुटुंब न्यायालयाने ती फेटाळून लावल्याने तिच्या वतीने उच्च न्यायालयात अर्ज केला होता.

या अर्जावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने याची गंभर दखल घेतली. जागतिकीकरण आणि सुशिक्षित नागरिकांचे नोकरी-व्यवसायानिमित्ताने भारताबाहेर जाण्याचे प्रमाण अधिक आहे. या नागरिकांसाठी प्रत्यक्ष हजर राहून घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्याबरोरबच अन्य बाबींची पुर्तता करण्यासाठी स्काईपसारख्या व्हिडीओ कॉलिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो, असा महत्वपूर्ण निर्वाळा देऊन त्या महिलेला मोठा दिलासा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button