breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ग प्रभागातील त्या दोन उपअभियंत्याचे सेवानिलंबन रद्द

आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा आदेश 

पिंपरी ( महा ई न्यूज ) -आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीला पूर्वसूचना न देता गैरहजर राहिलेल्या ग प्रभागातील दोन उपअभियंत्यावर सेवानिलंबनाची केलेली कारवाई रद्द करण्यात आली. याबाबत आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी आदेश दिला. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागात ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागात उपअभियंता किशोर महाजन व उपअभियंता विजयकुमार काळे हे कार्यरत होते.  21 जून 2018 रोजी थेरगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्याठिकाणी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी 22 जून रोजी त्यांच्या दालनात आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक आयोजित केली होती.

या बैठकीस दोन्ही उपअभियंता उपस्थित राहिले नाहीत. दोघांच्याही विनापरवाना गैरहजेरीमुळे आपत्ती व्यवस्थापन तसेच पाणीपुरवठा व जलनि:सारण अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण झाला. या परिस्थितीस महाजन आणि काळे हेच जबाबदार असल्याचा अहवाल ग क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रीय अधिका-यांनी 22 जूनला आयुक्तांना सादर केला.

त्यानुसार,  महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तात्काळ महाजन आणि काळे यांना सेवानिलंबित करण्याचे आदेश दिले. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर, कार्यकारी अभियंता मनोज सेठीया यांची त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. या समितीनेही आपल्या अहवालात आपत्कालीन परिस्थितीत महाजन व काळे यांनी पर्यवेक्षकीय नियंत्रण न ठेवल्याने आणि परिस्थिती उद्भवण्यापूर्वी योग्य उपाययोजना न केल्याने आपत्कालीन आरोग्य विघातक परिस्थिती उद्भवल्याचे निदर्शनास आणून दिले. असे असतानाही महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महाजन आणि काळे यांचे सेवानिलंबन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही उपअभियांत्यांनी तात्काळ पूर्ववत स्थानी रूजू व्हावे. तथापि, शास्ती कारवाईबाबत त्यांना 6 आक्टोबर 2018 रोजी बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसीवर नंतर निर्णय घेण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button