breaking-newsआंतरराष्टीय

ग्रीनकार्डच्या प्रतीक्षा यादीत भारतीय सर्वाधिक

वॉशिंग्टन :  भारतीय अतिकुशल तंत्रज्ञांमध्ये ग्रीनकार्ड मिळवण्यासाठी सर्वाधिक चढाओढ आहे. अमेरिकेच्या विभागाकडून प्रसिद्ध अधिक्त आकडेवारीनुसार, ग्रीनकार्डच्या प्रतीक्षा यादीत भारतीयांचे प्रमाण सुमारे तीन-चतुर्थांश इतके आहे. मे 2018 पर्यंत ग्रीनकार्डची प्रतीक्षा करणाऱया एकूण 3,95,025 विदेशी नागरिकांपैकी 3,06,601 जण भारतीय आहेत.

यादीत चिनी नागरिकांचे प्रमाण 67,031 इतके आहे. अमेरिकेत ग्रीनकार्ड प्राप्त करणाऱयांना कायमस्वरपी रहिवाशाचा दर्जा मिळतो. याचमुळे अमेरिकेत कायमस्वरुपी काम करणाऱयांमध्ये ग्रीनकार्डची मागणी अधिक आहे.

अमेरिकेतील कायद्यानुसार एका आर्थिक वर्षात कोणत्याही देशाच्या केवळ 7 टक्के लोकांनाच ग्रीनकार्ड दिले जाऊ शकते. या कोटय़ामुळे तेथील भारतीयांना ग्रीनकार्ड मिळविण्यासाठी 70 वर्षांपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. तर अमेरिकेच्या जीसी रिफॉर्म्स समुहाच्या संकेतस्थळानुसार कायद्यांतर्गत प्रतीक्षा यादीतील भारतीयांना स्थायी नागरिकत्व मिळविण्यासाठी 25 वर्षांपासून 92 वर्षांचा कालावधी लागू शकतो. अमेरिकेच्या वर्तमान स्थलांतर विषयक धोरणाचा सर्वात वाईट प्रभाव एच-1बी व्हिसानुसार अमेरिकेत काम करणाऱया भारतीयांवर पडत आहे.

अधिकृत आकडेवारीनुसार भारतीयांच्या नंतर सर्वाधिक चिनी नागरिक ग्रीनकार्डच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु उर्वरित देशांचा आकडा 10 हजारच्या नजीक देखील पोहोचत नाही. अल साल्वाडोरचे 7252, ग्वाटेमालाचे 6027, होंडुरासचे 5402, फिलीपाईन्सचे 1491, मेक्सिकोचे 700 आणि व्हिएतनामचे 521 जण प्रतीक्षा यादीत सामील आहेत.

ग्रीनकार्ड धारकांना अमेरिकेत कायमस्वरुपी रहिवाशाचा दर्जा मिळतो. याच्या माध्यमातून कोणताही व्यक्ती वैधपणे अमेरिकेत राहण्यासोबतच काम करू शकतो. नागरिकत्व मिळविण्याचे हे पहिले पाऊल मानले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button