breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

ग्रामसडक योजनेतील 96 टक्के रस्त्यांचा दर्जा चांगला

  • पंकजा मुंडे : 16 हजार किमीच्या रस्त्यांसाठी 9,776 कोटींच्या निधीस मान्यता

 
मुंबई – गावखेड्यांना दर्जेदार रस्त्यांनी जोडण्याच्या उद्देशाने राज्य शासनामार्फत मुख्यमंत्री ग्रामसडक योजना राबवण्यात येत आहे. या योजनेतून आतापर्यंत 3 हजार 221 इतकी कामे मंजूर करण्यात आली आहेत. यातून ग्रामीण भागात 16 हजार 229 किमी इतक्‍या लांबीच्या रस्त्यांची निर्मिती होणार असून यासाठी 9 हजार 776 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. तसेच रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत खासगी संस्थेकडून परिक्षण केले असता 96.33 टक्के रस्त्यांचा दर्जा चांगला असल्याचे निदर्शनास आले आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसंदर्भात आज सद्याद्री अतिथीगृह येथे आढावा बैठक झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव विवेक नाईक, ग्रामविकास विभागाचे उपसचिव रघुनाथ नागरगोजे यांच्यासह विविध जिल्ह्यांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

या योजनेतून 7 हजार 600 किमी लांबीच्या कामापैकी आतापर्यंत साधारण 5 हजार 804 किमी लांबीची कामे पूर्ण झाली असून 1 हजार 794 किमी लांबीची कामे प्रगतीपथावर आहेत. योजनेसाठी आतापर्यंत 6 हजार 686 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. तसेच रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेबाबत खासगी संस्थेकडून परिक्षण केले असता 96.33 टक्के रस्त्यांचा दर्जा चांगला असल्याचे निदर्शनास आले आहे. उर्वरीत 2.67 टक्के रस्त्यांची सुधारणा करण्याच्या सूचना ठेकेदारांना देण्यात आल्या असल्याची माहिती संबंधीत अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांनी समाधान व्यक्त केले.

रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना करा 
या रस्त्यांच्या कामांमध्ये टाकाऊ प्लॅस्टीकचा वापर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावणे, अपघात विरहीत होण्याच्या दृष्टीने रस्ते सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची कामे करताना या सर्व बाबींची अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचनाही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी कार्यकारी अभियंत्यांना दिल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button