breaking-newsराष्ट्रिय

गोव्यात सत्तेसाठी रस्सीखेच, काँग्रेसचे दोन आमदार भाजपाच्या गळाला

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांच्या आजारपणामुळे गोव्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एकीकडे भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने आपणाला सत्ता स्थापनेची संधी मिळावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासोबत गोव्यातील काँग्रेसचे दोन आमदार आज पहाटे भाजप श्रेष्ठींच्या भेटीसाठी दिल्लीला गेले आहेत. आज पहाटे दोन वाजाता गोवा विमानतळावर त्यांना पाहण्यात आले. गोव्याचे मुख्यंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांचा आजार गंभीर असल्याने भाजपा व सत्ताधारी आघाडीतूनही पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

गोव्यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. अशामध्ये दोन काँग्रेस फुटल्यानंतर त्यांच्यापुढील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे पहाटे दोन वाजता दिल्लीवारीसाठी रवाना झाले आहेत. दरम्यान, काँग्रेस पक्षाने सोमवारी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला निवेदन सादर करून, गोव्यामध्ये काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी द्यावी, परस्पर विधानसभा करू नये, अशी मागणी केली आहे.

#Visuals from Goa airport: Two Congress MLAs Subhash Shirodkar and Dayanand Sopte leave for Delhi with AYUSH Minister Shripad Naik. pic.twitter.com/7gYc9HHvqo

— ANI (@ANI) October 15, 2018

सरकारचे नेतृत्व कुणी करावे याबाबत भाजपच्या आमदारांमध्ये आणि एकूणच पक्ष संघटनेतही दोन गट आहेत. भाजपच्या तीन सदस्यीय केंद्रीय निरीक्षक समितीने आमदारांना प्रत्यक्ष भेटून आणि त्यांचे म्हणणे जाणून घेऊन भाजपमधील प्राप्त स्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपमधील एका गटाला नवा नेता हा भाजपमधूनच निवडला जावा असं वाटतं, तर दुसरा गट मात्र बाहेरून नेता आणला तरी चालेल पण त्या नेत्याच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण व्हावं असा मुद्दा मांडत आहे.

सुदिन ढवळीकर होणार मुख्यमंत्री?

मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पर्रिकर यांच्या गैरहजेरीत मुख्यमंत्रीपदाची सुत्रे मंत्रीमंडळात सर्वांत ज्येष्ठ असलेल्या मंत्र्याला पर्यायाने बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या कडे सोपवावी, अशी मागणी रेटून धरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button